कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:58+5:302021-06-03T04:13:58+5:30
परभणी : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम असून, बुधवारी ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर दोन ...

कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम
परभणी : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम असून, बुधवारी ३३ नवीन रुग्णांची नोंद झाली तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मागील दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. नवीन रुग्णसंख्या तसेच मृत्यूचे प्रमाणही घटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बुधवारीही रुग्णसंख्येतील ही घट कायम राहिली. आरोग्य विभागाला १ हजार ६३९ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या १ हजार ३५३ अहवालांमध्ये २२ आणि रॅपिड टेस्टच्या २८६ अहवालांमध्ये ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. जिल्ह्यात २ कोरोनाबाधित रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयातील २ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजार २० झाली असून, त्यापैकी ४६ हजार १८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २३५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. सध्या २ हजार ५९९ रुग्ण उपचार घेत आहेत.
२२० रुग्णांना सुट्टी
कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २२० रुग्णांना बुधवारी सुट्टी देण्यात आली. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही सध्या वाढले आहे.