अल्पसंख्याक दर्जासाठी महामोर्चा काढण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:52+5:302021-07-27T04:18:52+5:30
परभणी : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देऊन अल्पसंख्याक दर्जा द्यावा, या मागणीसाठी लवकरच महामोर्चा काढण्याचा निर्णय २६ ...

अल्पसंख्याक दर्जासाठी महामोर्चा काढण्याचा निर्णय
परभणी : लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देऊन अल्पसंख्याक दर्जा द्यावा, या मागणीसाठी लवकरच महामोर्चा काढण्याचा निर्णय २६ जुलै रोजी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
लिंगायत समन्वय समितीची विभागीय बैठक सोमवारी पार पडली. लिंगायत समजाला स्वतंत्र धर्म मान्यता देऊन अल्पसंख्याक दर्जा मिळाला पाहीजे, लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या मागण्यांसाठी परभणी जिल्ह्यात लिंगायत समाजाचा महामोर्चा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. एकजुटीतून हा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
बैठकीस जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामी (बंगळुरू) यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक ॲड. अविनाश भोसीकर, प्रभाकर वाघीकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, शिवहार बर्डे, नगरसेवक विनोद तरटे, धोंडीराज खाकरे, शिवलिंग बोधने, विजयकुमार हात्तुरे (सोलापूर), विनोद पोखरकर (बीड), प्रा. शेटे यांची प्रमुख उपस्थित होती.
कीर्तीकुमार बुरांडे यांनी प्रास्ताविक केले. बैठक यशस्वीतेसाठी प्रा. विलास साखरे, अमोल लांडगे, गजानन भस्के, शिवप्रसाद लोखंडे, दिलीप आप्पा मुखरे, शिवाजी आप्पा भालेराव, मिलिंद बुरांडे, डॉ. ओमप्रकाश वारकरी, प्रा. विकास येस्के, मन्मथ साखरे, आगजाळ, धिरज घोबाळे, सनी बुरांडे, नारायण निलंगे व लिंगायत समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.