बीड जिल्ह्यातील पुरणवाडी तांडा (ता. अंबाजोगाई) येथील माउली आडे हे सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील कारखान्याच्या ऊसतोडणीसाठी आले आहेत. त्यांची ऊसतोडणी सध्या धामोनी शिवारात सुरू आहे. तेथेच टोळीसह आडे कुटुंबीय राहते. २ मार्च रोजी साेनाली आडे या दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. तेथे घागरीला दोरी बांधून विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली. त्यानंतर सोनाली आडे यांचे पती माउली आडे यांनी विहिरीत उडी मारून शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र विवाहितेचा शोध लागला नाही. ३ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास विहिरीतून सोनाली आडे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. विष्णू राठोड यांनी या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, माउली आडे यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: The death of a married woman who fell into a well
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.