चौघांचा मृत्यू; ४४ रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST2021-06-05T04:13:53+5:302021-06-05T04:13:53+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमालीची घटली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे असले तरी रुग्णालयात ...

Death of four; Registration of 44 patients | चौघांचा मृत्यू; ४४ रुग्णांची नोंद

चौघांचा मृत्यू; ४४ रुग्णांची नोंद

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमालीची घटली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असे असले तरी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण काही अंशी अधिकच आहे. शुक्रवारी जिल्ह्यात १ हजार ५४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ४४ कोरोनबााधितांची नोंद झाली, तर ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. मयतांमध्ये जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद रुग्णालय, आयटीआय रुग्णालय, तसेच एक खाजगी रुग्णालय येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गुरुवारीही चार जणांचा मृत्यू झाला होता. दिवसभरात ४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ११४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ४७ हजार १३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार २४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, १ हजार ७३७ जण आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.

परभणी तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण

शुक्रवारी जिल्ह्यात ४४ बाधित रुग्ण आढळले. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे २० रुग्ण परभणी शहर व तालुक्यातील आहेत. याशिवाय जिंतूर तालुक्यातील ९, गंगाखेड तालुक्यातील १, सोनपेठ तालुक्यातील ३, सेलू तालुक्यातील २, पाथरी तालुक्यातील ३, मानवत तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय वसमत, परळी, अहमदपूर येथील रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Death of four; Registration of 44 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.