शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

दयामाया हरवली! पोटात बाळ घेऊन प्रवास पण जन्मताच ट्रॅव्हलमधून फेकलं; खुनाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:38 IST

ट्रॅव्हलमधून फेकलेल्या बाळाच्या हत्येचा पोलिसांनी लावला छडा

पाथरी (जि. परभणी) : समाजाच्या भीतीपोटी पोटात बाळ घेऊन प्रवास करणाऱ्या निर्दयी महिलेनं, प्रवासादरम्यानच जन्मलेलं बाळ ट्रॅव्हल बसमधून थेट रस्त्यावर फेकून दिल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पाथरी-सेलू रस्त्यालगत मंगळवारी सकाळी एका धावत्या ट्रॅव्हलमधून नवजात अर्भक रस्त्यावर फेकल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी आता दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळाला काळसर कपड्यांमध्ये गुंडाळून फेकण्यात आलं होतं. काही सजग नागरिकांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत, संबंधित ट्रॅव्हलचा शोध घेऊन परभणी येथे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

अखेर खुनाचा गुन्हा दाखलप्रसूतीनंतर आरोपी महिला रुग्णालयात उपचार घेत असून दुसऱ्या आरोपी अल्ताफ मेहनुदिन शेख याला अटक करण्यात आली. अर्भकाच्या शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर मार असल्याचे निष्पन्न झाले. यावरून केवळ बाळ फेकल्याचे नव्हे, तर ठार मारल्याचेही स्पष्ट झाल्याने पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचा कलमाचा समावेश केला आहे. आरोपीला पाथरी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

डीएनए चाचणीकडे लक्षतपासात दोघेही पती-पत्नी असल्याचे ते सांगत आहेत, मात्र अद्याप याचा कोणताही ठोस पुरावा पोलिसांकडे नाही. डीएनए चाचणीसाठी अहवाल पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी बाळाचे अंत्यसंस्कार मातेला देण्यात आलेल्या ताब्यानंतर पार पडले.

समाजात उद्विग्न भावनाही घटना केवळ एक गुन्हा नसून समाजातील जबाबदाऱ्या झटकण्याची आणि बाळावर अन्याय करण्याची क्रूर मानसिकताही दर्शवते. पोटात जपलेलं बाळ, प्रवासात जन्मलं, पण त्याच क्षणी जगातून निघून गेलं. यावर कोणताही शब्द पुरेसा नसल्याच्या उद्विग्न भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

पोलिसांची तत्परता कामी आली..घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत छडा लावला. आरोपीला अटक केली. तपास पोलिस उपनिरीक्षक माजी शेख यांनी केला. घटनेत खुनाचे कलम वाढ झाल्याने आता तपास पोलिस निरीक्षक महेश लांडगे करत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी