शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

शेतकऱ्यांवरील संकट टळले; सर्वदूर पावसाने पिकांना मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 13:15 IST

Rain in Parabhani : पंधरा ते वीस दिवसांचा खंड पडूनही पाऊस होत नसल्याने पिके धोक्यात आली होती.

ठळक मुद्देशेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते. वाढत असलेल्या उन्हामुळे पिकांना धोका वाढला होता.

परभणी: पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी रात्री पुनरागमन केले असून जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. (  Rains everywhere saved the crops in Parabhani District ) 

या वर्षीच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र १० जून नंतर पाऊस गायब झाला. पंधरा ते वीस दिवसांचा खंड पडूनही पाऊस होत नसल्याने पिके धोक्यात आली होती. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते. त्यातच वाढत असलेल्या उन्हामुळे पिकांना धोका अधिकच वाढला होता.

बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर भिज पाऊस झाला आहे. गुरुवारी देखील दिवसभर ढगाळ वातावरण असून पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे संकट दूर झाले आहे.

बुधवारी रात्री साधारणत बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाला प्रारंभ झाला. पूर्णा तालुक्यात सर्वाधिक २१ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यात १६.१, पाथरी १२.५, जिंतूर १२.४, पालम १२.५ सेलू १२.७, सोनपेठ ७.७, मानवत १०.२ आणि गंगाखेड तालुक्यामध्ये ८.१ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी १३.१ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत २७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत १३४ टक्के पाऊस अधिक झाला आहे.

परभणी ग्रामीण मंडळात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात बुधवारी रात्री सरासरी १३.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परभणी ग्रामीण मंडळांमध्ये सर्वाधिक ४७.५ मिमी पाऊस झाला. त्याचप्रमाणे पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळात २८ मिमी आणि पूर्णा तालुक्यातील कावलगाव मंडळात ३८ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच इतर मंडळातही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले आहे. 

या मंडळांकडे फिरवली पाठजिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असले तरी काही मंडळांमध्ये मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी, जिंतूर तालुक्यातील बोरी आणि पाथरी तालुक्यातील हादगाव या मंडळात पाऊस झाला नसल्याने मंडळातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

टॅग्स :RainपाऊसparabhaniपरभणीFarmerशेतकरी