पाऊण लाखांची वीज चोरी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST2021-08-24T04:22:38+5:302021-08-24T04:22:38+5:30
येथील जुना पेडगावरोड भागातील पोस्ट कॉलनीत एम.जी. बांगेवार यांच्या घरातील मीटरमध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या मीटरची तपासणी ...

पाऊण लाखांची वीज चोरी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हे
येथील जुना पेडगावरोड भागातील पोस्ट कॉलनीत एम.जी. बांगेवार यांच्या घरातील मीटरमध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या मीटरची तपासणी केली असता बांगेवार यांनी ३० हजार ६४५ रुपयांची वीज चोरी केल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे याच भागातील सद्गुरू नगर येथे गंगाबाई नारायणराव निर्वळ यांच्या घरातील मीटरमध्येही न्यूट्रलचे वायर कट करून वीज चोरी करण्यात आली. निर्वळ यांच्या घरी २१ हजार ७६२ रुपयांच्या विजेची चोरी करण्यात आली आहे. तर दर्गा रोडवरील मंगेश कॉलनीत शेख खदीर शेख सत्तार यांच्या घरातील मीटरमध्ये छेडछाड करून २३ हजार ६८८ रुपयांची वीज चोरी केल्याचे तक्रारीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी सहायक अभियंता रूपाली जोशी यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तीन तक्रारी दिल्या असून, त्यावरून वरील तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तिन्ही प्रकरणात ७६ हजार ९५ रुपयांच्या विजेची चोरी झाल्याचे तक्रारींवरून स्पष्ट होते.