मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST2020-12-05T04:27:44+5:302020-12-05T04:27:44+5:30
गंगाखेड तालुक्यातील पिंपरी येथील अजय भास्कर भिसे (२५) हे २ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गावातील बसस्थानकाजवळ उभे ...

मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
गंगाखेड तालुक्यातील पिंपरी येथील अजय भास्कर भिसे (२५) हे २ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गावातील बसस्थानकाजवळ उभे होते. तेव्हा त्या ठिकाणी आलेल्या राहुल जनार्दन भिसे याने तू माझे पैसे का दिले, असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील तलवारीने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. अजय भिसे हे चक्कर येऊन पडल्यानंतर जनार्दन भिसे यांनी दगड डोक्यात मारल्याची फिर्याद परभणी येथील रुग्णालयात उपचार घेताना अजय भिसे यांनी दिल्यावरून राहुल भिसे, नितीन भिसे व जनार्दन भिसे (रा. पिंपरी) या तिघांविरुद्ध ३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि. बालाजी गायकवाड करीत आहेत.