पाच हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST2021-07-27T04:19:05+5:302021-07-27T04:19:05+5:30
तक्रारदाराच्या वडिलांनी विकत घेतलेल्या शेतजमिनीचा फेर सातबारावर लावून देण्यासाठी कावलगाव सज्जाचे तलाठी आनंदा नारायण गायकवाड याने तक्रारदाराकडे ५ हजार ...

पाच हजारांची लाच मागणाऱ्या तलाठ्याविरुद्ध गुन्हा
तक्रारदाराच्या वडिलांनी विकत घेतलेल्या शेतजमिनीचा फेर सातबारावर लावून देण्यासाठी कावलगाव सज्जाचे तलाठी आनंदा नारायण गायकवाड याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरून ए.सी.बी.च्या पथकाने ९ जुलै रोजी कावलगाव येथील तलाठ्याच्या खाजगी कार्यालयात तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा तलाठी आनंदा नारायण गायकवाड याने पंचासमक्ष तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात तलाठी आनंदा गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक भरत हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरी हे तपास करीत आहेत.
या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली. या पथकाने या तक्रारीची फळकाढणी करून २६ जुलै रोजी सावरगाव येथील तलाठ्याच्या खासगी कार्यालयात सापळा लावला, त्यावेळी त्यामुळे तलाठी आनंदा नारायण गायकवाड याने पंचांसमक्ष पाच हजार रुपयांची मागणी केली.