पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यासह हॉटेल चालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST2021-09-11T04:19:42+5:302021-09-11T04:19:42+5:30
त्यावरून नानलपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता, यावेळी लघुशंकेच्या कारणावरून हाणामारी झाली असून, त्यात सहायक पोलीस निरीक्षक ...

पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यासह हॉटेल चालकावर गुन्हा
त्यावरून नानलपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असता, यावेळी लघुशंकेच्या कारणावरून हाणामारी झाली असून, त्यात सहायक पोलीस निरीक्षक कुरूंदकर, हॉटेल व्यावसायिक खमिसा मोहम्मद युसूफ हुसेन हे जखमी झाल्याचे पोलिसांना कळाले. यावेळी पोलिसांनी कुरूंदकर यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी मी व माझा मित्र अतुल पंचांगे मदनी हॉटेल येथे जेवण करून परतत असताना दुकानाच्या एका बाजूला लघुशंका केली असता, मदनी हॉटेल चालक व अन्य एकाने मारहाण केली. यावेळी मदनी हॉटेल चालक खमिसा मोहम्मद यांना विचारणा केली असता, त्यांनी दुकानाच्या शटरजवळ लघुशंका केल्याचे कारण विचारले असता, मारहाण केल्याचे सांगितले. यावेळी कुरूंदकर व खमिसा मोहम्मद हे जखमी झाल्याने त्यांना दवाखान्यात उपचारसाठी जाण्यास सांगितले असता, पुन्हा त्यांनी हाणामारी केली. या वेळी पेालिसांना त्यांना सोडवासोडव करून सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. याबाबत फौजदार मारोती बाबूराव चव्हाण यांनी शुक्रवारी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आरोपी सपोनि अनिल सखाराम कुरूंदकर, अतुल पंचांगे, खमिसा मोहम्मद युसूफ हुसेन व अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.