अवैध देशी दारू प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:22 IST2021-08-14T04:22:29+5:302021-08-14T04:22:29+5:30
शहरातील मानवत ते मानवत रोड रस्त्यावर एक जण दुचाकीवरून अवैधरित्या दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या ...

अवैध देशी दारू प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
शहरातील मानवत ते मानवत रोड रस्त्यावर एक जण दुचाकीवरून अवैधरित्या दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक भारत जाधव आणि विशेष पथकाने १२:३० वाजता गजानन मंदिराजवळ रामा नारायण उफाडे (रा. देवनाद्रा) याची दुचाकी अडवून तपसणी केली तेव्हा ५ हजार ५६० रुपये किमतीच्या देशी दारू भिंगरीच्या ९६ बॉटल आढळून आल्या. तर दुसऱ्या कारवाईत सकाळी ११:१० वाजेच्या सुमारास विश्राम गृहासमोर दुचाकीवरून दारू घेऊन जात असताना कारवाई करीत २ हजार ४०० रुपये किमतीच्या ४० बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी रामा नारायण उफाडे व किरण दगडू वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास बळीराम थोरे करीत आहेत.