जयंती मिरवणूक काढणाऱ्या १६ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:10+5:302021-04-30T04:22:10+5:30

पूर्णा तालुक्यातील देवठाणा येथे २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गंगाखेडच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, पोलीस उपनिरीक्षक इजळकर, ...

Crime against 16 people who took out a jubilee procession | जयंती मिरवणूक काढणाऱ्या १६ जणांविरुद्ध गुन्हा

जयंती मिरवणूक काढणाऱ्या १६ जणांविरुद्ध गुन्हा

पूर्णा तालुक्यातील देवठाणा येथे २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गंगाखेडच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, पोलीस उपनिरीक्षक इजळकर, जमादार रतन सावंत, खंडेराय राऊत, प्रल्हाद वाघ, जनार्दन मुंडे हे गावात गस्तीवर गेले होते. यावेळी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २२ एएम ३५२९) च्या ट्रॉलीमध्ये डीजे लावून काही जण जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलून जयंती मिरवणूक काढण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी एक ट्रॅक्टर, सहा साउंड बॉक्स, एक जनरेटर, एक ॲम्प्लिफायर, साउंड मिक्सर मशीन असा एकूण चार लाख ४३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून ठाण्यात आणला. याप्रकरणी पोलीस नाईक दत्तराव पडोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डीजेमालक धोंडिबा मरिबा खंदारे, ट्रॅक्टरमालक नितीन नामदेव खंदारे यांच्यासह अन्य १४ जण (सर्व रा. देवठाणा ता. पूर्णा) या १६ जणांविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास रतन सावंत हे करीत आहेत.

Web Title: Crime against 16 people who took out a jubilee procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.