क्रेनिओटॉमी मेंदू शल्यचिकित्सा यशस्वी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:43 IST2021-01-13T04:43:00+5:302021-01-13T04:43:00+5:30

या आजारामध्ये रुग्णास डोळे जड पडणे, न दिसणे किंवा एका वस्तूच्या दोन आकृती दिसणे, झटके, तीव्र डोकेदुखी, उलटी, घाबरल्यासारखे ...

Craniotomy Brain Surgery Successful! | क्रेनिओटॉमी मेंदू शल्यचिकित्सा यशस्वी!

क्रेनिओटॉमी मेंदू शल्यचिकित्सा यशस्वी!

या आजारामध्ये रुग्णास डोळे जड पडणे, न दिसणे किंवा एका वस्तूच्या दोन आकृती दिसणे, झटके, तीव्र डोकेदुखी, उलटी, घाबरल्यासारखे वाटणे डोळ्यांच्या बाहुल्या स्थिर न राहणे ई. लक्षणे दिसून येतात. रुग्णालयातील मेंदू विकार शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद अंभोरे यांनी ही क्रेनिओटॉमीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. या आधी रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ.गोविंद रसाळ यांनी पेसमेकर, डॉ.भूषण चव्हाण यांनी बाल हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. सदरील शस्त्रक्रिया व उपचार हा रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत विनामूल्य मोफत करण्यात आला आहे. या यशाबद्दल डॉ.श्रीपाद अंभोरे यांचे, तसेच रुग्णालयातील त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांचे संचालक डॉ.प्रफुल्ल पाटील, रुग्णालयाच्या संचालिका तथा मनपा सदस्या डॉ.विद्या प्रफुल्ल पाटील यांनी अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Craniotomy Brain Surgery Successful!