आखाड्यावरून गाय, बैल चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST2021-06-05T04:13:56+5:302021-06-05T04:13:56+5:30
कोल्हा येथील शेतकरी ज्ञानेश्वर बाळासाहेब तारे यांची यशवाडी शिवारात शेती आहे. १ मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांनी ...

आखाड्यावरून गाय, बैल चोरीस
कोल्हा येथील शेतकरी ज्ञानेश्वर बाळासाहेब तारे यांची यशवाडी शिवारात शेती आहे. १ मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांनी शेतातील आखाड्यावर बैल बांधले होते. रात्री १२ च्या सुमारास पाऊस आल्याने ते इतर ठिकाणी झोपण्यासाठी गेले. सकाळी ६ च्या सुमारास ते आखाड्यावर परतले असता, त्यांचा एक बैल गायब असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी त्यांचे मित्र ज्ञानेश्वर किशनराव तारे यांना फोन करून विचारले असता, त्यांनीही त्यांची एक गाय चोरीस गेल्याचे सांगितले. या बाबत ज्ञानेश्वर तारे यांनी मानवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुरुवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी लंपास
सेलू शहरातील समतानगर भागातून श्रीकांत रघुनाथ गीते यांची एमएच २२ एएफ ९३७७ क्रमांकाची दुचाकी १ मे च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल केला आहे.