जनकल्याण समितीतर्फे कोविड केंद्रात समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST2021-05-12T04:17:50+5:302021-05-12T04:17:50+5:30
अक्षदा मंगल कार्यालयातील कोविड केंद्रामध्ये दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत रुग्णांकडून योगाची प्रात्याक्षिके करून घेतली जात आहेत. ...

जनकल्याण समितीतर्फे कोविड केंद्रात समुपदेशन
अक्षदा मंगल कार्यालयातील कोविड केंद्रामध्ये दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत रुग्णांकडून योगाची प्रात्याक्षिके करून घेतली जात आहेत. यासाठी निरामय योग केंद्राचे योगशिक्षक डॉ. धीरज देशपांडे, वर्षा रामपूरकर, श्रुती वैद्य मार्गदर्शन करीत आहेत. त्याचप्रमाणे मनोरंजनासाठी विविध खेळ, हास्ययोग, प्रार्थना आदी उपक्रमही राबविले जात आहेत.
कोरोना काळात रुग्णांचे आरोग्य सुदृढ राहावे तसेच रुग्णांची मानसिकता चांगली राहावी, यासाठी जनकल्याण समितीने पुढाकार घेतला आहे. जनकल्याण समितीच्या सुरेखा दराडे, सुनीता तालखेडकर, क्रांतीताई हमदापूरकर, श्रीलेखा वझे, विजय पेशकार, पुनम श्रीरामवार, शुभदा दिवाण, प्रदीप साखरे, दत्ता चट्टे, रवी पेशकार आदी याकामी प्रयत्न करीत आहेत.
जनकल्याण समितीच्या वतीने कोरोना काळात विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्यामध्ये फोनद्वारे रुग्णांचे समुपदेशन करणे, विविध केंद्रांतील गरजू रुग्णांना जेवणाचा डबा पुरविणे, लसीकरण, रक्तदान, प्लाझ्मा दान करणे आदींविषयी जनजागृती केली जात आहे. या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे.