शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : परभणी जिल्ह्यातील आर्थिक उलढालीचे 'लॉक' उघडणार; कृषी, आरोग्यासह इतर व्यवसाय खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 20:20 IST

बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल सुरु होण्याची शक्यता

परभणी: जिल्ह्यातील कृषी, कृषी क्षेत्रावर आधारित इतर व्यवसाय, आरोग्य क्षेत्रातील व्यवसाय आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील व्यवसाय सुरु करण्याची मुभा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर मंगळवारी विविध आदेशान्वये दिली असून त्यामुळे एक महिन्यापासून ठप्प असलेली जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे.

कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे मागील महिनाभरापासून कृषी क्षेत्रातील बाजारपेठही ठप्प पडली होती. शेतमाल उपलब्ध असतानाही तो विक्री करता आला नाही. 

शिवाय शेतीच्या कामांनाही फटका बसला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी २१ एप्रिल रोजी एक आदेश जारी केला असून त्यात परभणी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्र, कृषी विषयी साहित्य, साधान सामुग्रीची दुकाने, बीज प्रक्रिया केंद्र, बीज तपासणी प्रयोगशाळा, कृषी विषयक उत्पादने, कृषी सेवा पुरविणाºया अस्थापना, कृषी साहित्य दुरुस्त करणाºया अस्थापना, बोअरवेल मशीन पूर्ववत सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या निर्देशांचे पालन करीत कृषी अस्थापना सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या काळात सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करावे, आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून मजूर आणण्यास प्रतिबंध केला आहे. जिल्ह्यातील कृषी विषयक अस्थापना सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिल्याने या क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे बुधवारपासून कृषी बाजारपेठेत चहलपहल वाढण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे आयुष योजनांच्या समावेशासह सर्व आरोग्य सेवा सुरु करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. त्यामध्ये दवाखाने, सुश्रूशागृह, चिकित्सालय, टेलि मेडिसीन सुविधा, औषधालय, औषध निर्माण केंद्र, वैद्यकीय उपकरणांची दुकाने, वैद्यकीय प्रयोगशाळा आणि संग्रह केंद्र, कोविड १९ च्या संबंधाने संशोधन करणारे औषध निर्माण केंद्र आणि वैद्यकीय संशोधन प्रयोगशाळा, पशूवैद्यकीय दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, कोविड १९ चे प्रतिबंध संबंधाने कार्य करणा-या मान्यता प्राप्त खाजगी संस्था, होमकेअर सेवा पुरविणाऱ्या संस्था, रोग निदान संस्था आदी सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील सेवाही सुरु करण्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले. त्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा, त्यामध्ये ५० टक्के कर्मचारी कार्यरत असावेत, ई- कॉमर्स कंपनीच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहने, आवश्यक त्या परवानगीसह सुरु ठेवता येतील. ज्यामध्ये अन्नऔषध, वैद्यकीय उपकरणे, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे या सारख्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवेचा पुरवठा यांचा समावेश आहे. 

रमजान महिन्यात घरातच धार्मिक कार्य पार पाडावे

मुस्लिम समाज बांधवांना पवित्र रमजान महिना सुरु होत असून या महिन्यात सार्वजनिक नमाज अदा करण्याची प्रथा आहे. सद्यस्थिती विचारात घेता अधिक संख्येने नागरिक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने मुस्लिम समाज बांधवांनी लॉकडाऊनच्या काळात एकत्र न येता आपापल्या घरातच धार्मिक कार्य पार पाडावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना या विषाणूमुळे पसरत असलेला आजार संसर्गजन्य म्हणून घोषित केला आहे. नुकताच परभणी शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून पवित्र रमजान महिन्यात मुुस्लिम समाजातील नागरिक नमाजसाठी एकत्र येत असतात. त्यामुळे सद्यस्थिती लक्षात घेता कोरोना प्रसार रोखण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी आपापल्या घरातच नमाज अदा करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी