शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : दुबई, लंडन ते फ्रांस; १८ देशातून परभणी जिल्ह्यात आले ५६ नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 20:57 IST

राज्य शासनाला अहवाल सादर

ठळक मुद्देदुबईतून आले सर्वाधिकजिल्हा प्रशासनाची माहिती

परभणी : राज्यासह देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना या आजाराची धास्ती प्रशासनानेही घेतली असून १ मार्चपासून आतापर्यंत परदेशातून जिल्ह्यात दाखल झालेल्या व्यक्तींची माहिती राज्य शासनाने मागविली आहे़ या माहिती संबंधित व्यक्ती कोरोना बाधित आहे का? यापासून ते त्याच्या कायमस्वरुपी पत्त्यासह संपर्क क्रमांकाची माहितीही मागविण्यात आली आहे़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने एकूण ५६ जणांची यादी राज्य शासनाकडे पाठविली आहे़ 

कोरोनाचा रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणास सतर्क झाली आहे़ कोरोनाचा प्रादुर्भाव परदेशी नागरिकांपासूनच होण्याची शक्यता असल्याने परदेशातून येणाºया नागरिकांची माहिती घेण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली़ व्यावसायिक कामाच्या निमित्ताने, पर्यटनच्या निमित्ताने जिल्ह्यातून विदेशात जाणाºया नागरिकांची संख्या वाढली आहे़ हे नागरिक पुन्हा स्वगृही परत येत असताना त्यांच्यासोबत कोरोनाचा संसर्गही  होवू नये, या उद्देशाने या सर्व नागरिकांची आरोग्य विभागाने तपासणी केली़ दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिकार केला जात आहे़ त्याच पार्श्वभूमीवर राज्य शसनाने परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती मागविली आहे़ ही माहिती देत असताना नागरिकाचे नाव, त्याचा पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आणि कोणत्या देशातून आला याची मागविण्यात आली आहे़ त्याच प्रमाणे संबंधित व्यक्तीला काही त्रास होत असेल तर कोणत्या दवाखान्यात दाखल आहे? त्या दवाखान्यातून उपचार घेवून डिस्चार्ज मिळाला असेल तर त्याचा दिनांक तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या आरोग्याचा अहवाल या  बाबतची माहिती मागविण्यात आली आहे़

प्रशासनाच्या या पत्रानुसार जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना जिल्ह्यातील ही सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे़ १८ विविध देशातून ५६ नागरिक परभणीत दाखल झाले असून, त्यात सर्वाधिक दुबईमधून आलेल्या १२ नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती राज्य शासनाकडे पाठविली आहे,असे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ़ संजय कुंडेटकर यांनी सांगितली़कोणत्या देशातून आले किती नागरिकशारजाह : १फिलिपाईन : २दुबई : १२जपान : २अबूधाबी : ३बेल्जीयम : १कतार : २मास्को : ४रशिया : २ सौदी अरेबिया : ८कुवैंत : १बेहरीन : ३कझागीस्तान : ५अमेरिका : ६आॅस्ट्रेलिया : १युगांडा : १लंडन : १फ्रान्स : १