कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ने वाढविली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:13 IST2021-06-29T04:13:34+5:302021-06-29T04:13:34+5:30
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ५० हजार ८३३ रुग्ण आढळले आहेत. मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात रुग्ण संख्या ...

कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ने वाढविली चिंता
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ५० हजार ८३३ रुग्ण आढळले आहेत. मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी प्रमाणात आढळून येत असली तरी प्रशासनाने बाजारपेठेतील सर्व अत्यावश्यक सेवा आणि अन्य दुकानांना नवे निर्बंध सोमवारपासून लागू केले आहेत. यामुळे डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या कोरोना टेस्टिंगची संख्या वाढविण्याचे प्रशासनाने सर्व यंत्रणांना आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण - ५०,८३३
बरे झालेले रुग्ण - ४९,२५६
उपचार सुरू असलेले - २९६
एकूण मृत्यू - १२८१
जिल्ह्यात दररोज १५०० टेस्टिंग सुरु
जिल्ह्यात १ ते २७ जून या कालावधीत परभणी शहरासह सर्वच तालुक्यांत ३१ हजार ५०८ जणांच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या. यामध्ये ७१६२ अँटिजन चाचण्या तर २४३४६ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. परभणी शहर मनपाच्यावतीने तीन ठिकाणी चाचणी करण्यात येते. तसेच जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जात आहेत. यामध्ये सर्वाधिक चाचणी परभणी, जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यात करण्यात आल्या. जिल्ह्यात रविवारी २१६८ तर शनिवारी २१५२ चाचण्या करण्यात आल्या होत्या.
टेस्टिंग वाढविण्याच्या सर्व यंत्रणांना सूचना
जिल्हा परिषद आरोग्य विभाग तसेच शहर मनपा आणि नगरपरिषद हद्दीत पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने दररोज टेस्टिंगची संख्या वाढविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना दिले आहेत. यानुसार प्रशासन कामाला लागले आहे. तर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बाजारपेठांना कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका ओळखून नवे निर्बंध लागू केले आहेत. सोमवारपासून बाजारपेठ दुपारी ४ वाजेपर्यंत तर जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील एसटीची सेवा बंद केली आहे.