१५० नागरिकांना कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST2021-04-14T04:16:05+5:302021-04-14T04:16:05+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना राज्य शासनाकडून मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच ...

१५० नागरिकांना कोरोना लसीकरण
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना राज्य शासनाकडून मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच मार्च महिन्यापासून कोविड-१९ लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या बामणी येथील ग्रामस्थासाठी १३ एप्रिल रोजी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी ३०० उपलब्ध झाल्या होत्या. त्यामध्ये मंगळवारी १५० ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर भराडे, डॉ.श्रीकांत तोंडे, आरोग्य सहायिका मंगला क्षीरसागर, परिचारिका घोगरे, हिवाळे, आरोग्य सेवक बबन खिल्लारे, एम.जे. लाटे, एस.एन. सिद्दीकी यांच्यासह अंगणवाडीताई व आशा वर्कर्स यांची उपस्थिती होती. दरम्यान, बामणी येथील उर्वरित ग्रामस्थांना चार दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.