कोरोनाचा उद्रेक सुरूच; ३४१ नवे रुग्ण; सहाजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:53+5:302021-03-25T04:17:53+5:30

दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढली आहे. दररोज २०० ते ३०० नवीन रुग्णांची नोंद होत आहेत. २४ मार्चरोजी १ ...

Corona outbreaks continue; 341 new patients; Death of six | कोरोनाचा उद्रेक सुरूच; ३४१ नवे रुग्ण; सहाजणांचा मृत्यू

कोरोनाचा उद्रेक सुरूच; ३४१ नवे रुग्ण; सहाजणांचा मृत्यू

दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढली आहे. दररोज २०० ते ३०० नवीन रुग्णांची नोंद होत आहेत. २४ मार्चरोजी १ हजार ५३३ जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार १५४ अहवालांमध्ये २४२ आणि रॅपिड टेस्टच्या ३७९ अहवालांमध्ये ९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत.

एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. दररोज रुग्ण दगावत असल्याने जिल्हावासीयांत चिंता निर्माण झाली आहे. बुधवारी शासकीय रुग्णालयात उपचार घेणारा १ पुरुष आणि १ महिला तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणारे ४ पुरुष अशा ६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता ११ हजार ६२२ झाली असून, ९ हजार ९९५ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. ३६४ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार २६३ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.

शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ११६ रुग्णांवर उपचार सुरू असून, खासगी रुग्णालयात २२० रुग्ण उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ९२७ झाली आहे.

Web Title: Corona outbreaks continue; 341 new patients; Death of six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.