कोरोनाने जिल्ह्यात १४ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:35+5:302021-05-17T04:15:35+5:30
मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. सध्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला ...

कोरोनाने जिल्ह्यात १४ जणांचा मृत्यू
मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. सध्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे; परंतु कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे सत्र मात्र अद्यापही थांबलेले नाही. रविवारी १४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. येथील जिल्हा रुग्णालयात ४, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ३, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ४ आणि खासगी रुग्णालयात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये ९ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाला रविवारी ९६८ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ६५४ अहवालांमध्ये १७७ आणि रॅपिड टेस्टच्या ३१४ अहवालांमध्ये ७६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४६ हजार १६८ झाली असून, त्यापैकी ४२ हजार ५ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार १३१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ३ हजार ३२ रुग्ण उपचार घेत आहेत.
७८५ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे. मागील दोन आठवड्यांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही बाधित होणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक असल्याने समाधान व्यक्त होत आहे. रविवारी ७८५ रुग्णांना कोरोनाची कोणती लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे रुग्णांना सुट्टी देण्यात आली.