शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शांतता समितीच्या बैठकीतच वाद; अवैध धंद्यावरून आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यात खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 18:15 IST

आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे यानी गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून अवैध धंद्याना आळा घालावा अशी मागणी केली.

गंगाखेड (परभणी):  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीतच वाद झाल्याचा प्रकार आज घडला. अवैध धंद्यांच्या मुद्द्यावर आमदार आणि पोलीस अधिकारी आमनेसामने आल्याने बैठकीत वातावरण चांगलेच गरम झाले. हा सर्व प्रकार आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला.शांतता समितीच्या बैठकीत आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे यांनी अवैध धंदे  हप्तेखोरीमुळे बंद होत नाहीत असा मुद्दा उपस्थित करून पोलीस अधिकाऱ्यास जबाबदार धरले. यावर पोलीस अधिकाऱ्याने पुरावे दाखवा असे आव्हान दिले. यामुळे आमदार गुट्टे आणी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद सुरु झाला. 

येथिल संत जनाबाई महाविद्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे यानी गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून अवैध धंद्याना आळा घालावा अशी मागणी केली. तसेच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हप्तावसुली करतात. यामुळे जुगार, गुटखा, दारू यासारखे अवैध धंदे बोकाळले आहेत. हे धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी जमादारामार्फतची हप्ता वसुली बंद केल्यास तात्काळ अवैध धंदे बंद होतील असे शांतता समितीच्या बैठकीत सागितले.

यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल माने व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रैणीक लोढा यांनी हप्ता वसुलीचे पुरावे द्या असे विनाकारण आरोप करू नका असे आवाहन केले. आमदार गुट्टे आणि पोलीस अधिकारी लोढा यांच्यात आरोप प्रत्यारोप करत वाद झाला. आमदार गुट्टे यांनी पोलिसांच्या कार्यशैलीवरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तर खोटे आरोप करू नका पुरावे दाखवा असे म्हणत पोलीस अधिकारी जागेवरचे उठून बोलल्याने  बैठकित अवैध धंद्याचा मुद्दा चांगलाच गाजला. शांतता समितीच्या बैठिकीत पोलीस अधिकारी आणि आमदार यांच्यात झालेल्या आरोप प्रत्यारोपाच्या वादाची  नागरीकातुन दिवसभर  चर्चा झडत होती.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMLAआमदार