प्लास्टिकचा वापर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:41+5:302021-04-15T04:16:41+5:30
गंगाखेड रस्त्याला तडे परभणी : गंगाखेड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करण्यात आला ...

प्लास्टिकचा वापर सुरूच
गंगाखेड रस्त्याला तडे
परभणी : गंगाखेड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करण्यात आला असून, या रस्त्याला ब्राह्मगाव ते उमरी फाटा यादरम्यान तडे गेले आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जावर शंका उपस्थित होत आहे.
रस्ता उखडला
परभणी : येथील जिल्हा परिषदेची नवीन इमारत ते नारायणचाळ हा रस्ता उखडला आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
भुईमुगाचा पेरा वाढला
परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने भुईमुगाचा पेरा वाढला आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामाची तयारी सुरू केली असून, जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्याच्या भरवशावरच भुईमुगाचे पीक घेतले जात आहे.
फळांची आवक वाढली
परभणी : शहरातील बाजारपेठेत फळांची आवक वाढली आहे. उन्हाळ्यात टरबूज, खरबुजांना मागणी वाढते. ही बाब लक्षात घेऊन खरबूज आणि टरबुजांची आवक वाढली आहे. त्याचप्रमाणे चिकू, आंबा ही फळेही विक्रीसाठी दाखल झाली आहेत.