चाटे कुटुंबीयांचे फडणवीस यांच्याकडून सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST2021-06-05T04:13:45+5:302021-06-05T04:13:45+5:30
भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत अभय चाटे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. बुधवारी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे ...

चाटे कुटुंबीयांचे फडणवीस यांच्याकडून सांत्वन
भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष दिवंगत अभय चाटे यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. बुधवारी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी चाटे यांच्या व्यंकटेश नगरातील निवासस्थानी भेट दिली. तसेच त्यांच्या निधनाबद्दल कुटुंबीयांकडे दुःख व्यक्त करून त्यांचे सांत्वन केले. चाटे हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. परभणी जिल्ह्यात पक्षवाढीसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल्याचे सांगून त्यांनी दिवंगत अभय चाटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी चाटे यांच्या मातोश्री, पत्नी, मुले तसेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, राजेश देशपांडे, नगरसेवक मधुकर गव्हाणे, अनुप शिरडकर, संजय रिझवाणी, संजय कुलकर्णी, गणेशराव रोकडे, बालाजी देसाई, बालाप्रसाद मुंदडा आदींची उपस्थिती होती.