डाव्या कालव्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST2021-04-12T04:15:45+5:302021-04-12T04:15:45+5:30
पाणीपुरवठा योजना अपूर्णच जिंतूर : तालुक्यात मागील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री पेयजल व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या पाणीपुरवठा ...

डाव्या कालव्याची दुरवस्था
पाणीपुरवठा योजना अपूर्णच
जिंतूर : तालुक्यात मागील दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री पेयजल व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या वर्णा, वडाळी, असोला येथील योजना पूर्णत्त्वास गेल्या आहेत. मात्र, भोगाव येथील योजनेची किरकोळ कामे बाकी आहेत. लिंबाला येथील केवल विहिरीचे काम पूर्ण झाले आहे.
दिग्रसफाटा रस्त्याच्या कामांना मिळेना गती
परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तालुक्यातील दिग्रस फाटा ते जलालपूर पाटी या रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्यावर संबंधित कंत्राटदाराने गिट्टी अंथरून ठेवली आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा
सेलू : तालुक्यात वाळूमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून, दुधना नदीपात्रातून दिवस-रात्र वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. ट्रॅक्टरमधून सर्रास या वाळूची वाहतूक केली जात असून, यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगितले जात आहे.
५४१ हेक्टरवर ऊसाची लागवड
सोनपेठ : तालुक्यात यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत चांगला पाऊस झाला. या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले असले तरी दुसरीकडे नदी, नाले, तलावात मुबलक पाणीसाठा झाला. त्यामुळे तालुक्यात यावर्षी ५४१ हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली आहे.
उद्यानातील झाडे सुकू लागली
परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उद्यानातील झाडांना नियमित पाणी दिले जात नाही. त्यामुळे ही झाडे सुकू लागली आहेत. येथील लाॅनही वाळून गेली आहे. या उद्यानाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी कर्मचारी नसल्याने ही स्थिती आहे.
अस्ताव्यस्त वाहनांमुळे रहदारीला अडथळा
परभणी : येथील जिल्हा परिषद इमारतीच्या परिसरात कामानिमित्त येणारे नागरिक अस्ताव्यस्त वाहने उभी करत आहेत. त्यामुळे रहदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षासमोरील हे चित्र नियमित पाहावयास मिळत आहे.