पूर्णेत रुग्णाच्या नातेवाइकांची निवाऱ्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:18 IST2021-05-12T04:18:04+5:302021-05-12T04:18:04+5:30
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णाच्या नातेवाइकांची गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेता बुद्धविहार समितीच्या वतीने ...

पूर्णेत रुग्णाच्या नातेवाइकांची निवाऱ्याची व्यवस्था
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णाच्या नातेवाइकांची गैरसोय होत होती. ही अडचण लक्षात घेता बुद्धविहार समितीच्या वतीने या नातेवाइकांच्या निवाऱ्याची जबाबदारी घेण्यात आली आहे. या व्यवस्थेची ११ मे रोजी औपचारिक सुरुवात करण्यात आली. डॉ.बी.आर. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीचे अध्यक्ष डॉ. उपगुप्त महाथेरो, भंते बोधिधम्म, भंते पयावंश, तहसीलदार पल्लवी टेमकर, ॲड. हर्षवर्धन गायकवाड, श्रीकांत हिवाळे, तलाठी राठोड, पाटील, प्रा.मोहनराव मोरे, प्रकाशदादा कांबळे, अशोक कांबळे, साहेबराव सोनवणे, संजय शिंदे, मिलिंद सोनकांबळे, अतुल गवळी, किशोर धाकरगे, विजय जोंधळे, अनिल खर्गखराटे, पी.जी. रणवीर, दिलीप गायकवाड, त्र्यंबक कांबळे, मोहन लोखंडे, अमृत कराळे आदींची यावेळी उपस्थिती होती. बुद्धविहार समितीच्या वतीने मान्यवरांचा पुष्पहार, स्मृतिचिन्ह व स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.