कंट्रोल रूमकडे लस मिळत नसल्याच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST2021-07-15T04:14:11+5:302021-07-15T04:14:11+5:30
जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना सुविधा उपलब्ध व्हावी तसेच गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना वेळेत ...

कंट्रोल रूमकडे लस मिळत नसल्याच्या तक्रारी
जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना सुविधा उपलब्ध व्हावी तसेच गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने जिल्हास्तरावर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर या कंट्रोल रूमला दररोज २० ते २२ नागरिक संपर्क करून मदतीची मागणी करीत आहेत. कोरोना संसर्ग कमी झाल्याने लसीकरणासंदर्भात नागरिकांकडून मदत मागितली जात आहे. लस उपलब्ध होत नाही, लस केव्हा मिळेल? यासह लसीकरण केंद्रांवर असलेल्या असुविधा संदर्भात कंट्रोल रूमकडे तक्रारी येत आहेत.
२७ दिवसांत २०५ तक्रारी
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या कंट्रोल रूममध्ये १७ जूनपासून आलेल्या तक्रारींची नोंद घेण्यात आली आहे. पोस्ट कोविड रुग्णांसाठी ही कंट्रोल रूम सध्या काम करीत आहे. २७ दिवसांमध्ये या कंट्रोल रूमकडे २०५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील सर्वाधिक तक्रारी लसीच्या संदर्भाने आहेत.
कोरोना काळात जेवणाच्या तक्रारी
कोरोना संसर्ग काळात याच कंट्रोल रूमकडे दररोज २० ते २२ तक्रारी दाखल होत होत्या. त्यात आयटीआय येथील कोविड रुग्णालयात रुग्णांना जेवण वेळेवर मिळत नाही, त्याचप्रमाणे आरटीपीसीआर तपासणीचे अहवाल उशिराने मिळत आहेत, रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही या स्वरूपाच्या तक्रारी केल्या जात होत्या.