विपश्यना केंद्र उभारणीच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST2021-06-09T04:21:57+5:302021-06-09T04:21:57+5:30
रविराज पार्क परिसरात विपश्यना केंद्राची उभारणी केली जात आहे. रविवारी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. ...

विपश्यना केंद्र उभारणीच्या कामास प्रारंभ
रविराज पार्क परिसरात विपश्यना केंद्राची उभारणी केली जात आहे. रविवारी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. या प्रसंगी पू. भदंत डॉ. उपगुप्त महास्थवीर, पूज्य भदंत मुदितानंद थेरो, महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, सिद्धार्थ भालेराव, माजी सभापती रवि सोनकांबळे, मिलिंद सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार सुरेश वरपुडकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यानंतर आता रविराज पार्क येथे होणाऱ्या विपश्यना केंद्रासाठी पुढाकार घेताना समाधान वाटते. पूज्य भदन्त डॉ.उपगुप्त महास्थवीर म्हणाले, मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी बुद्धांनी विपश्यना ही जगाला दिलेली देणगी असून, रविराज पार्कमधील केंद्र येणाऱ्या काळात एक आदर्श केंद्र बनेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे या विपश्यना केंद्राचे नालंदा असे नामकरणही करण्यात आले. कार्यक्रमात प्रा. संजय मोहोळ यांनी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन केले. प्रा. डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. इंजिनिअर भीमप्रकाश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. भारत इंगोले यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेवक सचिन देशमुख, चंदू शिंदे, रितेश झांबड, सुशील कांबळे, रामचंद्र रोडे, बबलू टाक, डॉ. संजय खिल्लारे, धम्मज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीत जोगदंड, माजी अध्यक्षा ललिताताई वाव्हळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी करण गायकवाड, प्रा. डॉ. आनंद मनोहर, प्रा. सुनील आहेराव, बी.आर. आव्हाड, रमेश रणवीर, ईश्वर बडोले, आर.एन. मस्के, कपिल ढेंबरे, मधुसूदन इंगळे, संजय सदावर्ते, बी.डी. बडेराव, जे.व्ही. मोडके, चंद्रकांत सरपे, सुदाम इंगोले आदींनी प्रयत्न केले.