जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोनाची दुसरी लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST2021-03-07T04:16:38+5:302021-03-07T04:16:38+5:30

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या लसीचा पहिला डोस दिला जात आहे. ...

The collector took the second corona vaccine | जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोनाची दुसरी लस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोनाची दुसरी लस

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या लसीचा पहिला डोस दिला जात आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ६ फेब्रुवारी रोजी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. एक महिना उलटल्यानंतर आज ६ मार्च रोजी लसीकरणातील दुसरा डोस घेऊन त्यांनी लसीकरणाचे दोन टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे व इतर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्या उपस्थितीत त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. कोविड-१९ लसीकरणासाठी शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या आहेत. संपूर्ण लसीकरण मोहिमेत पावलोपावली दक्षता घेण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. त्यामुळे ही लस पूर्णत: सुरक्षित असून, प्रत्येकाने लसीकरण करु घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले.

Web Title: The collector took the second corona vaccine