जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST2021-07-15T04:14:04+5:302021-07-15T04:14:04+5:30
जिल्ह्यात मंगळवारी रात्री अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. विशेषत पालम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, या तालुक्यातील जवळपास ...

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश
जिल्ह्यात मंगळवारी रात्री अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. विशेषत पालम तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, या तालुक्यातील जवळपास सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे. पावसाचे पाणी शेतशिवारात घुसल्याने हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेले. त्याचप्रमाणे पावसाने ओढे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे पिके बाधित झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. अतिवृष्टीची स्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी महसूल प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. १२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करावेत. तसेच नुकसानीचा अहवाल तातडीने जिल्हा कार्यालयाला कळवावा, अशा सूचना तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना दिल्या आहेत.