अस्वच्छतेवरून जिल्हाधिकारी, सीईओंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:23 IST2021-08-25T04:23:10+5:302021-08-25T04:23:10+5:30
तहसील कार्यालयाची आंचल यांच्याकडून पाहणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मंगळवारी सकाळी वाजता १०.३० च्या सुमारास परभणी तहसील कार्यालयास अचानक ...

अस्वच्छतेवरून जिल्हाधिकारी, सीईओंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी
तहसील कार्यालयाची आंचल यांच्याकडून पाहणी
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मंगळवारी सकाळी वाजता १०.३० च्या सुमारास परभणी तहसील कार्यालयास अचानक भेट दिली. प्रारंभी त्यांनी सर्व कर्मचारी कार्यालयात वेळेवर आले आहेत का, याची तपासणी केली. त्यावेळी एक महिला कर्मचारी उशिराने आल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यास समज दिली. त्यानंतर कार्यालय परिसरातील अस्वच्छता पाहून संताप व्यक्त केला. तहसीलदार बिरादार यांना याचा जाब विचारला. त्यावेळी बिरादार यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यावेळी आंचल यांनी येथील कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतागृहातील अस्वच्छतेबद्दलही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील कार्यालयाची पाहणी करताना तहसीलदार बिरादार यांना तेथील काही विभागाची माहिती विचारली असता त्यांना ती सांगता आली नाही. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार बिरादार यांना कामात सुधारणा करण्याची समज दिली, तसेच यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांना सुनावत त्यांचे या कार्यालयाकडे लक्ष नाही. तातडीने कामात सुधारणा करा, असा सज्जड इशारा कुंडेटकर यांना दिला.