परभणीत केंद्रीय अधिकाºयाकडून स्वच्छतेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:48 IST2017-12-23T00:48:18+5:302017-12-23T00:48:27+5:30
शहरात महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस केंद्रीय स्वच्छता मंत्रालयाच्या अधिकाºयांनी पाहणी केली.

परभणीत केंद्रीय अधिकाºयाकडून स्वच्छतेची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरात महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस केंद्रीय स्वच्छता मंत्रालयाच्या अधिकाºयांनी पाहणी केली.
केंद्रातील अधिकारी विपीन कुमार हे गुरुवारी परभणीत मनपाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी मनपातर्फे उभारण्यात आलेले वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय यांचा होणारा वापर, शाळांमधील स्थिती, हगणदारीमुक्ती आदींची पाहणी केली. महानगरपालिकेने आॅनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून जेवढी माहिती स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने अपलोड केली, त्याची पडताळणी विपीन कुमार यांनी केली. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी विपीन कुमार यांच्या दौºयाची माहिती गुप्त ठेवली. त्यामुळे लोकप्रतिनिधींनाही त्यांना भेटला आले नाही. परभणी शहर हगणदारीमुक्त झाले नसतानाही शासनाचा अधिक निधी मिळावा, यासाठी तसा ठराव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. या ठरावाला काही मनपा सदस्यांनी विरोध दर्शविला होता. परंतु, त्यांचाही विरोध तकलादू ठरला.