बंडू जाधव यांचा आज नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:20 IST2021-09-26T04:20:33+5:302021-09-26T04:20:33+5:30

परभणी : परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त ...

Civil felicitation of Bandu Jadhav today | बंडू जाधव यांचा आज नागरी सत्कार

बंडू जाधव यांचा आज नागरी सत्कार

परभणी : परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच या महाविद्यालयासाठी लढा देणारे खासदार बंडू जाधव यांचा २६ सप्टेंबर रोजी नागरी सत्कार केला जाणार आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही परभणीकर या व्यासपीठावरून खासदार बंडू जाधव यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जनआंदोलन उभे केले. खासदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विविध समाजघटकांनी मोठा सहभाग नोंदविला. या आंदोलनाची दखल घेत मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देत असल्याची घोषणा केली. याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमास आमदार सुरेश वरपूडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आ. सुरेश देशमुख, महापौर अनिता सोनकांबळे, माजी महापौर प्रताप देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम आदींसह विजय वाकोडे, उपमहापौर भगवान वाघमारे, माजू लाला, ॲड. अशोक सोनी, कॉ. राजन क्षीरसागर, कीर्तीकुमार बुरांडे, सभापती गुलमीर खान, जाकेर लाला, डॉ. राजू सुरवसे, गणपत भिसे, संजय मंत्री आदींची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात विविध संघटनांच्या वतीने खासदार बंडू जाधव यांचा सत्कार केला जाणार आहे.

Web Title: Civil felicitation of Bandu Jadhav today