शहरातील पथदिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:51+5:302021-03-25T04:17:51+5:30

उद्यानातील जलकुंभांची रंगरंगोटी परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानात नवीन जलकुंभ उभारण्यात आला असून दोन दिवसांपूर्वी या उद्यानाची रंगरंगोटी करण्यात ...

City streetlights off | शहरातील पथदिवे बंद

शहरातील पथदिवे बंद

उद्यानातील जलकुंभांची रंगरंगोटी

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानात नवीन जलकुंभ उभारण्यात आला असून दोन दिवसांपूर्वी या उद्यानाची रंगरंगोटी करण्यात आली. जलकुंभावर पाणी साठवणक्षमता तसेच ज्या योजनेतून जलकुंभ उभारला आहे, त्या योजनेचे नाव आदी माहिती देण्यात आली आहे.

सॅनिटायझर यंत्रणा बंद अवस्थेत

परभणी : शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये मागील वर्षी बसविलेली सॅनिटायझर यंत्रणा सध्या बंद अवस्थेत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने ही यंत्रणा सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. तेव्हा शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर बंधनकारक करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

मुख्य रस्त्यांवर वाढली अतिक्रमणे

परभणी : शहरातील बाजारपेठ भागासह इतर मुख्य रस्त्यांवर किरकोळ अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही. परिणाम वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. मनपाने ही अतिक्रमणे हटवावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: City streetlights off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.