परभणी जिल्ह्यात नाताळ उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:29 AM2019-12-26T00:29:09+5:302019-12-26T00:29:43+5:30

जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये बुधवारी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन नाताळचा सण म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला़ धार्मिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़

Christmas celebrated in Parbhani district | परभणी जिल्ह्यात नाताळ उत्साहात साजरा

परभणी जिल्ह्यात नाताळ उत्साहात साजरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये बुधवारी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन नाताळचा सण म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला़ धार्मिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़
परभणी शहरात बुधवारी सकाळपासूनच नाताळ सणाची लगबग दिसून आली़ शहरातील विविध चर्चमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती़ सकाळी प्रार्थनेचा कार्यक्रम पार पडला़ यावेळी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत समाजबांधव उत्साहाने सहभागी झाले होते़ शहरातील सरफराज नगर येथील फेथ ए़जी़ चर्चमध्ये नाताळचा सण साजरा करण्यात आला़ फादर डॅनियल एस़ तारु यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले़ प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मानिमित्त आपण एकत्र आलो आहोत़ त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपले जीवन येशू ख्रिस्तांच्या तारणाचा पोशाख परिधान करून त्यांच्या विचारांचे आचरण करून जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले़ शहरातील सरफराज नगर भागातील सीएनआय चर्च, इनायतनगर आणि परसावतनगर येथील चर्च आॅफ द नॅझरीन येथेही नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला़ फेथ ए़जी़ चर्चमध्ये नाताळ सणानिमित्त आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या कन्येच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले़ त्यानंतर मुलांनी नृत्य, नाटकांचे सादरीकरण केले़ या कार्यक्रमांना समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़

Web Title: Christmas celebrated in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.