बाल संसदने मानले कोरोनायोद्ध्यांचे ऋण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST2021-02-05T06:03:13+5:302021-02-05T06:03:13+5:30
एचडीएफसी परिवर्तन आणि मॅजिक बस यांच्या वतीने दिशा प्रकल्प महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात काम करत आहे. त्यापैकी तालुक्यातील आरखेड, रावराजूर, ...

बाल संसदने मानले कोरोनायोद्ध्यांचे ऋण
एचडीएफसी परिवर्तन आणि मॅजिक बस यांच्या वतीने दिशा प्रकल्प महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात काम करत आहे. त्यापैकी तालुक्यातील आरखेड, रावराजूर, सायाळ या गावांत मुलांच्या विकासासाठी दिशा प्रकल्प काम करते. कोरोनाची लस मिळाल्यामुळे देशवासीयांना दिलासा मिळाला आहे .याच अनुषंगाने दिशा प्रकल्पाच्या वतीने आरखेड या गावात बाल संसदेच्या वतीने एक उपक्रम राबविण्यात आला. दोन्ही गावांच्या शालेय बाल मंत्रिमंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतला. बाल मंत्रिमंडळातील सर्व पदाधिकारी मुलांनी आपल्या गावातील सरपंच, आशा सेविका, उपकेंद्रातील डॉक्टर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, शिक्षक या सर्व गावपातळीवरील कोरोनायोद्ध्यांचे पुष्पगुच्छ आणि शुभेच्छापत्र देऊन आभार व्यक्त केले. कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करत हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी दिशा प्रकल्पाच्या राज्य समन्वयक जयश्री प्रेमानंद, प्रकल्प समन्वयक विनोद शंभरकर आदी उपस्थित हाेते.