परभणीत बीडीओंच्या खुर्चीला चपलांचा हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:14 IST2018-02-22T00:14:20+5:302018-02-22T00:14:36+5:30
विकास कामांचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर टाकण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी गटविकास अधिकाºयांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या सरपंचांना गटविकास अधिकाºयांनी प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त होवून तालुक्यातील सरपंचांनी गटविकास अधिकाºयांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून गटविकास अधिकाºयांची बदली करावी, अशी मागणी केली़

परभणीत बीडीओंच्या खुर्चीला चपलांचा हार
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विकास कामांचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर टाकण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी गटविकास अधिकाºयांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या सरपंचांना गटविकास अधिकाºयांनी प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त होवून तालुक्यातील सरपंचांनी गटविकास अधिकाºयांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून गटविकास अधिकाºयांची बदली करावी, अशी मागणी केली़
परभणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़व्ही़ करखडेलकर यांच्याकडे आहे़ विकास कामे हेतुपुरस्सर रोखून धरणे आणि १४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना देण्यास करखडेलकर टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तालुक्यातील सरपंचांनी केला़ या संदर्भात बुधवारी तालुक्यातील सरपंचांचे शिष्टमंडळ मुख्य कार्यकारी अधिकाºयांना भेटण्यासाठी जिल्हा परिषदेत गेले़
मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी दौºयावर असल्याने याच ठिकाणी करडखेलकर यींची त्यांच्या कक्षात सरपंचांनी भेट घेतली़ यावेळी चर्चा करीत असतानाच करडखेलकर हे कक्षातून बाहेर पडले आणि कोणताही तोडगा निघाला नाही़
सरपंचांनी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रश्न मांडला़ राठोड यांनी करडखेलकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा मी पंचायत समितीतील कक्षात असल्याचे त्यांनी सांगितले़ त्यामुळे सरपंचांचे शिष्टमंडळ पंचायत समितीत आले़ परंतु, या ठिकाणीही करडखेलकर उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या सरपंचांनी करडखेलकर यांच्या रिकाम्या खुर्चीला चपलांचा हार घालून आपल्या भावना व्यक्त केल्या़
गटविकास अधिकारी करडखेलकर हे विकास कामे हेतुपुरस्सर रखडून ठेवत आहेत़ १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत विकास कामांचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला जातो़ मात्र माझ्या परवानगीशिवाय हा निधी देऊ नये, असे पत्र करडखेलकर यांनी बँकांना दिले आहे़ शासन ग्रामपंचायतींना निधी देत असताना कोणत्या नियमांच्या आधारे करडखेलकर यांनी हे पत्र दिले, असा सवाल सरपंच संघटनेने सीईआेंंना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे़ तसेच करडखेलकर यांची बदली करण्याची मागणीही करण्यात आली आहे़ निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष ऐश्वर्य वरपूडकर, रसिका किशोर ढगे, भारत आव्हाड, मीरा जाधव, गोविंद ढोले, कौशल्य आवकाळे, कृष्णा गरुड, शुभांगी मोरे आदींची नावे आहेत़