भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST2021-06-27T04:13:09+5:302021-06-27T04:13:09+5:30
भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी समाजाच्या रद्द झालेल्या आरक्षणाचा प्रश्न चक्काजाम आंदोलनातून मांडण्यात आला. यामध्ये ओबीसी समाजाला आरक्षण तात्काळ ...

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने चक्काजाम आंदोलन
भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी समाजाच्या रद्द झालेल्या आरक्षणाचा प्रश्न चक्काजाम आंदोलनातून मांडण्यात आला. यामध्ये ओबीसी समाजाला आरक्षण तात्काळ देण्यात यावे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुका रद्द करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. सुमारे पाऊण तास हे आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, एन.डी. देशमुख, सुनील देशमुख, दिनेश नरवाडकर, विजय दराडे, संजय कुलकर्णी, रामदास पवार, मोहन कुलकर्णी, अनंता गिरी, संतोष जाधव, मुकीम खिल्लारे, रितेश जैन, सुप्रिया कुलकर्णी, गीता सूर्यवंशी, ऐश्वर्या कांबळे, विजय गायकवाड, गणेश जाधव, संजय जोशी, गणेश देशमुख, संजय शेळके, रोहित जगदाळे, समीर दुधगावकर, मिरज बुचाले, प्रिया पेदापल्ली, सारिका धुमाळ, विजया कातकडे, शकुंतला मठपती, डाॅ. पुष्पा मुंडे, प्रिया कुलकर्णी, पूनम शर्मा यांच्यासह जवळपास १०० पदाधिकाऱ्यांचा चक्काजाम आंदोलनात सहभाग होता. या आंदोलनाला वंजारी सेवा संघ असोसिएशन, राष्ट्रीय नाभिक संघ व ब्राह्मण महासंघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यावेळी नानलपेठ तसेच कोतवाली पोलीस स्टेशन आणि दंगा नियंत्रण पथकाने तगडा बंदोबस्त आंदोलनस्थळी ठेवला होता. चक्काजाम आंदोलनामुळे जिंतूर महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. प्रशासनाकडून आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेण्यात आल्या. पोलीस ठाण्यात सर्व आंदोलकांना हजर करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने आंदोलकांची सुटका करण्यात आली.