कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत सेलू तालूका आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:16 IST2021-02-15T04:16:16+5:302021-02-15T04:16:16+5:30
देवगावफाटा: सेलू तालूका कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत जिल्ह्यात आघाडीवर असून येथील उपजिल्हा रुग्णालयाची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. उपजिल्हा रुग्णालय ...

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत सेलू तालूका आघाडीवर
देवगावफाटा: सेलू तालूका कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत जिल्ह्यात आघाडीवर असून येथील उपजिल्हा रुग्णालयाची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला देण्यात आलेेले १ हजार ३५ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट आरोग्य यंत्रणेने पूर्ण केेले आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी सेलू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयास ५३० व तालुका आरोग्य अधिकारी यांना ५०५ अशाप्रकारे १०३५ केसेसचे उद्दिष्ट दिले होते. परंतु , मार्च महिन्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा दिवसरात्र उपाययोजनांच्या कामात व्यस्त राहिली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांच्या नियोजनातून कोरोना रुग्णांना सेलू येथेच उपचार मिळाला, ही उल्लेखनीय कामगिरी होती. मात्र, अशा स्थितीत नियमित रुग्णसेवेसही येथे प्राधान्य दिले गेले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर नियमित ठेवले. यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत प्रतिसाद कमी असला तरी ५३ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर मात्र ऑक्टोबर ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत यामध्ये कमालीचा प्रतिसाद मिळाला. २०७ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच ३ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली आहे. उपजिल्हा रुग्णालयास ५३० चे उद्दिष्ट असताना येथे आतापर्यंत ५३६ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये प्रा.आ.केंद्र देऊळगाव गात येथे १२ फेब्रुवारी शिबीर घेण्यात आले. यामध्ये १७ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मार्च २०२१ पर्यंत सेलू तालूक्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मनोदय आरोग्य यंत्रणांच्या कामकाजावरून दिसून येत आहे
सेलू तालुक्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत टाक्यासाठी २६० महिलांची शस्त्रक्रिया तर २७३ महिलांची बिनटाका शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच ३ पुरुष नसबंदी अशा एकूण ५३६ केसेस येथे पूर्ण झाल्या आहेत.