विविध कार्यक्रमांनी बुद्ध पौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:27+5:302021-05-28T04:14:27+5:30
साखला प्लॉट परभणी साखला प्लॉट येथे वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी भंते मुदितानंद थेरो यांनी धम्मदेसना दिली. कार्यक्रमास महापौर ...

विविध कार्यक्रमांनी बुद्ध पौर्णिमा साजरी
साखला प्लॉट परभणी
साखला प्लॉट येथे वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी भंते मुदितानंद थेरो यांनी धम्मदेसना दिली. कार्यक्रमास महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, माजी सभापती रवी सोनकांबळे, डॉ. सिद्धार्थ भालेराव, डॉ. प्रकाश डाके, डॉ. बी. टी. धुतमल, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भीमराव शिंगाडे, एस. एन. शेख, जिल्हा कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, मिलिंद सावंत, ॲड. रवी गायकवाड, पंकज खेडकर, प्रा. राजेश रणखांब, उत्तमराव हत्तीअंबिरे, सिद्धार्थ भराडे, करण गायकवाड आदी उपस्थित होते.
गौतमनगर, परभणी
गौतमनगर येथील श्रावस्ती महिला मंडळाच्यावतीने पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सभापती आकाश लहाने, विजय झोडपे, राहुल भराडे, विकास मालसमिंदर आदींसह श्रावस्ती महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
सत्यम दिव्यांग संघटना
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जयंती साजरी करण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे प्रशांत वाव्हुळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संजय वाघमारे, शैलेश नवघडे, संतोष जोंधळे, प्रदीप गांधारे, सचिन जोगदंड, रामराज कांगणे, दासराव पुंडगे आदी उपस्थित होते.
अजिंठानगर, परभणी
अजिंठानगर येथील जयंती उत्सव समितीच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कु. आर्याजी सुचितानंद बोधी, प्रा. डॉ. भीमराव खाडे, जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा ज्योती बगाटे, द्वारकाबाई गंडले, लखन सौंदरमल, बी. आर. जाधव, हनवते, बाळासाहेब इंगोले, अरुण लोखंडे, नंदाताई गायकवाड, संगीता नरवाडे, सुनील नरवाडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लक्ष्मीकांत धुतराज, सुनील नरवाडे, अतुल थोरात, तेजस नरवाडे आदींनी प्रयत्न केले.
बार्टी परभणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या समता दूत प्रकल्प कार्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी भंते विमल कीर्ती यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा प्रकल्प अधिकारी दी. फ. लोंढे, विद्या मेश्राम, महादेव तुरे, शेख मुमताज, शेख करीम आदींची उपस्थिती होती.