राष्ट्रीय मतदान दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:07 IST2021-02-05T06:07:22+5:302021-02-05T06:07:22+5:30
सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते २५ नवीन मतदारांना ओळखपत्र देऊन त्यांचा सत्कार ...

राष्ट्रीय मतदान दिन साजरा
सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते २५ नवीन मतदारांना ओळखपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, खा.फौजिया खान, खा.बंडू जाधव, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपूडकर, आ.मेघना बोर्डीकर, आ.रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, त्याचप्रमाणे बीएलओ विठ्ठल शेळके, सीमा देशमुख, शाकेर खान, मो.जावीद मो.इकबाल आदींची उपस्थती होती. १ फेब्रुवारीपासून नवीन मतदारांना ऑनलाईन मतदान कार्ड प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवडणूक विभागातील अव्वल कारकून नानासाहेब भेंडेकर, प्रविण कोकांडे, गोकुळ पवार, वैजनाथ भेंडेकर, राजेश कीर्तनकार, दिवाकर जगताप, बबन भराडे आदींनी प्रयत्न केले.