विद्यापीठ रोडवर वाळूचा टिप्पर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:18 IST2021-04-28T04:18:57+5:302021-04-28T04:18:57+5:30
सायाळा मार्गे अवैद्य वाळू घेऊन एक टिप्पर येत असल्याची माहिती नवा मोंढा पोलिसांना मिळाली. त्यावरून वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या ...

विद्यापीठ रोडवर वाळूचा टिप्पर पकडला
सायाळा मार्गे अवैद्य वाळू घेऊन एक टिप्पर येत असल्याची माहिती नवा मोंढा पोलिसांना मिळाली. त्यावरून वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राच्या परिसरातील रस्त्यावर सोमवारी पोलीस दबा धरून बसले. सायंकाळी सातच्या सुमारास एमएच ०४ के ९००४ क्रमांकाचा टिप्पर परभणी शहराच्या दिशेने येताना पोलिसांना दिसला. यावेळी या टिप्परला थांबवून पोलिसांनी कागदपत्रे विचारली असता त्याच्याजवळ ती आढळून आली नाहीत. टिप्परमध्ये वाळू आढळून आली. धनगर टाकळी येथून ही वाळू आणून परभणीतील गंगाखेड नाका येथे साठवून ठेवणार असल्याचे यावेळी टिप्पर चालक व मालक आरेफ अब्दुलखान पठाण याने सांगितले. यावेळी वाळू व टिप्पर जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी नऱ्होजी रणमाळ यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी आरेफ अब्दुलखान पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.