राजन मंगरुळकर/परभणी : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भरारी पथकाने शनिवारी मध्यरात्री एक वाजता गंगाखेड नाका परिसरात नाकाबंदी दरम्यान एका दुचाकीस्वाराकडे असलेली पाच लाख ६० हजारची रोख रक्कम कारवाईत जप्त केली.
शहराच्या सर्व महामार्गावर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकांची स्थापना केली आहे. गंगाखेड नाका येथील पथक क्रमांक एक मधील कोतवालीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले यांच्यासह आचारसंहिता विभागाच्या पथकाने वाहनांच्या तपासणी दरम्यान (एमएच २२ एएल २१३८) या दुचाकी वाहनाची डिक्की उघडली असता तपासणीत तेथे पाच लाख साठ हजार रुपयांची रोकड आढळून आली.
या रकमेबाबत कोणतेही कागदपत्र दस्तऐवज नसल्याने पुढील कार्यवाही करण्यात आली. पंचनामा केला असता संबंधित वाहनधारकाने कुठलाही समाधानकारक खुलासा न केल्याने भरारी पथकाने ही रक्कम मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास जप्त केली. त्यानंतर ती जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयात जमा केली आहे. रोख रक्कम जप्तीची ही निवडणुकीतील पहिलीच कारवाई ठरली आहे.
Web Summary : ₹5.6 lakhs was seized from a two-wheeler during a blockade near Gangakhed Naka due to the ongoing municipal elections. The individual could not provide documentation for the cash. The money was deposited in the district treasury.
Web Summary : गंगाखेड़ नाका के पास नगर निगम चुनावों के कारण नाकाबंदी के दौरान एक दोपहिया वाहन से ₹5.6 लाख जब्त किए गए। व्यक्ति नकदी के लिए दस्तावेज नहीं दे सका। पैसा जिला कोषागार में जमा किया गया।