नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्याने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:16 IST2017-11-22T00:13:15+5:302017-11-22T00:16:09+5:30
बांधकाम परवानगी सोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम न करता नकाशा व्यतीरिक्त अनाधिकृत बांधकाम करून नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाºयाविरूद्ध २० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्याने गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
ंगंगाखेड : बांधकाम परवानगी सोबत जोडलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम न करता नकाशा व्यतीरिक्त अनाधिकृत बांधकाम करून नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाºयाविरूद्ध २० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील वकील कॉलनीत राहणाºया कृष्णा नागनाथ पद्ममवार यांनी त्यांच्या मालकीच्या मालमत्ता क्रमांक ५९ ए/३/१ जागेत बांधकाम करण्याकरीता २० नोव्हेंबर २०१६ रोजी नगर पालिकेकडून बांधकाम परवानगी घेतली. मात्र बांधकाम परवाना काढतेवेळी सोबत जोडलेल्या नकाशामध्ये दर्शविलेल्या नकाशा प्रमाणे बांधकाम न करता नकाशा व्यतीरिक्त ६ फूट ६ इंच अनाधिकृत बांधकाम करीत नगरपालिकेच्या १४ फूट ६ इंच जागेवर अतिक्रमण करून बांधकाम पूर्ण केले़
ही बाब स्वच्छता निरीक्षक गोपाळ मधुकर राजेंद्र यांंच्या निदर्शनास आल्याने २७ सप्टेंबर २०१७ रोजी नगरपालिकेच्या वतीने कृष्णा पद्मवार यांना अनाधिकृत बांधकामाविषयी नोटीस पाठविण्यात आली.
नोटीस बजावून एक महिना उलटला तरीही पद्मवार यांनी अतिक्रमण न काढल्याने स्वच्छता निरीक्षक गोपाळ राजेंद्र यांनी २० नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा पद्मवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि सुरेश थोरात, सुलक्षण शिंदे, मिलींद जोगदंड हे करीत आहेत.