टायर फुटलेली कार घसरत नदीपात्रात पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:51+5:302021-02-05T06:06:51+5:30
परभणी ते वसमत या रस्त्यावर राहटी परिसरात सध्या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत रस्ताचे काम सुरू आहे. त्यामुळे एका बाजूने रस्ता खोदून ...

टायर फुटलेली कार घसरत नदीपात्रात पडली
परभणी ते वसमत या रस्त्यावर राहटी परिसरात सध्या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत रस्ताचे काम सुरू आहे. त्यामुळे एका बाजूने रस्ता खोदून ठेवला आहे. त्याचप्रमाणे राहटी पुलाजवळच नवीन पूल उभारणीचेही काम सुरू आहे. दरम्यान, २९ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास परभणीकडून एक कार (एम.एच.४९, बी८८४६) नांदेडकडे जात असताना पुलापासून अलीकडेच या कारचे टायर फुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेने असलेल्या उतारावरून ही कार सरळ घसरत घसरत १० फूट खोल नदीपात्रात शिरली. कारमध्ये तिघे जण असल्याची माहिती मिळाली. या तिघांना किरकोळ मार लागला आहे. दरम्यान, ३० जानेवारी रोजी सकाळी या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी कार नदी पात्राबाहेर काढली. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक सुनील रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली भारत तावरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.