परभणी शहरातून निघाला कँडल मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:56 IST2018-04-16T00:56:10+5:302018-04-16T00:56:10+5:30
जम्मूतील कथुआ येथे ८ वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहरातून कँडलमार्च काढत घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला़

परभणी शहरातून निघाला कँडल मार्च
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जम्मूतील कथुआ येथे ८ वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहरातून कँडलमार्च काढत घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला़
येथील धार रोड परिसरातील एकमिनार मशिदीपासून या कँडलमार्चला सुरुवात झाली़ अपना कॉर्नर, शनिवार बाजारमार्गे हा कँडलमार्च शिवाजी चौकात पोहचला़ या कँडलमार्चमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते़ हातात मेणबत्ती घेऊन निघालेल्या या कँडलमार्चमध्ये सहभागी नागरिकांनी वुई वाँट जस्टीस, आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशा घोषणा दिल्या़ रात्री १० वाजेच्या सुमारास शिवाजी चौकात हा कँडलमार्च पोहोचला़ यावेळी नगरसेवक लियाकत अन्सारी, सभापती महेमुद खान, इरफानूर रहेमान खान, उपमहापौर माजू लाला, नदीम इनामदार, विशाल बुधवंत आदींनी मार्गदर्शन केले़
मौलाना जहांगीर नदवी यांनी पीडित मुलगी व तिच्या परिवारासाठी दुवाँ मागितली़ याच ठिकाणी कँडलमार्चची सांगता झाली़ दरम्यान, गुजरी बाजार, गांधी पार्क, मुल्ला मशिद, आरआर टॉवर, नारायण चाळ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आदी भागातही नागरिकांनी मेणबत्ती लावून कथुआ येथील घटनेचा निषेध नोंदविला़