तीन वर्षांपासून बसपोर्टच्या कामाला मिळेना गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:17 AM2021-05-08T04:17:49+5:302021-05-08T04:17:49+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बसस्थानकाचे रूपांतर अद्ययावत अशा बसपोर्टमध्ये करण्यासाठी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ...

Busport work has not gained momentum for three years | तीन वर्षांपासून बसपोर्टच्या कामाला मिळेना गती

तीन वर्षांपासून बसपोर्टच्या कामाला मिळेना गती

Next

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बसस्थानकाचे रूपांतर अद्ययावत अशा बसपोर्टमध्ये करण्यासाठी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी ४ लाख ४८ हजार ६०० रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. मात्र २०१८ पासून भूमिपूजन झालेल्या बसपोर्टचे काम २०२१ मध्ये ही पूर्णत्वास जात नसल्याचे दिसून येत आहे. कधी निविदा, कधी कोरोना तर कधी निधीच्या प्रश्नामुळे तीन वर्षांपासून या बसपोर्टचे काम संथगतीने सुरू आहे. सद्यस्थितीत संबंधित कंत्राटदारांनी फुटिंग पर्यंतचे काम पूर्ण केले आहे. आतापर्यंत या कंत्राटदारांकडून ५० लाख रुपयांचे काम करण्यात आले आहे. मात्र १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर असतानाही एसटी महामंडळाकडून या कंत्राटदाराला आतापर्यंत केवळ २५ लाख रुपये लाख रुपयांची देयके देण्यात आले आहेत. त्यामुळे मंजूर असलेला निधी वेळेत मिळत नसल्याने २०२१ मध्ये तरी या बसपोर्टचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न परभणीकरांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देऊन किमान तीन वर्षानंतर तरी या बसपोर्टच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.

प्रवाशांची गैरसोय होईना दूर

परभणी येथे अद्ययावत अशा बसपोर्टच्या कामासाठी जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे सद्यस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरते पत्राचे शेड उभारण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही भौतिक सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागातील प्रवाशांना ही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Busport work has not gained momentum for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.