बस पोर्टचे काम पडले ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST2021-05-30T04:15:30+5:302021-05-30T04:15:30+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बस स्थानकाचे रूपांतर अद्ययावत अशा पासपोर्ट मध्ये करण्यासाठी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते ...

बस पोर्टचे काम पडले ठप्प
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बस स्थानकाचे रूपांतर अद्ययावत अशा पासपोर्ट मध्ये करण्यासाठी तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तेरा कोटी चार लाख ४८ हजार ६०० रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. मात्र, २०१८ पासून भूमिपूजन झालेल्या बस फोरचे काम २०२१ मध्येही पूर्णत्वास जात नसल्याचे दिसून येत आहे. कधी निविदा, तर कधी निधीच्या प्रश्नामुळे तीन वर्षांपासून या बस पोर्टचे काम संथगतीने सुरू आहे. सद्यस्थितीत संबंधित कंत्राटदारांनी फुटिंगपर्यंतचे काम पूर्ण केले आहेत. एसटी महामंडळाकडे आतापर्यंत या कंत्राटदारांकडून ५० लाख रुपयांचे काम करण्यात आले आहे. मात्र, १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर असतानाही एसटी महामंडळाकडून या कंत्राटदाराला आत्तापर्यंत केवळ २५ लाख रुपयांची देयके देण्यात आले आहेत. त्यामुळे मंजूर असलेला निधी वेळेत मिळत नसल्याने, या बस पोर्टचे काम ठप्प पडले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देऊन या बस पोर्टच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.