बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST2021-08-26T04:20:55+5:302021-08-26T04:20:55+5:30
परभणी : राज्यांतर्गत आणि जिल्ह्यांतर्गत बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने बसस्थानकावरील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पूर्वपदावर आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ...

बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रूळावर !
परभणी : राज्यांतर्गत आणि जिल्ह्यांतर्गत बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने बसस्थानकावरील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पूर्वपदावर आली आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे बसस्थानकावर किरकोळ व्यवसाय करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या विक्रेत्यांवर आतापर्यंत उपासमारीची वेळ आली होती. रोजचा व्यवसाय बुडाल्याने त्यांना इतर रोजगार शोधावा लागला होता. मात्र, मागच्या दोन महिन्यांपासून एसटी महामंडळाची बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली असून, प्रवाशांचा प्रतिसादही वाढला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांचे उत्पन्न पुन्हा सुरू झाले असून, निर्माण झालेला रोजीरोटीचा प्रश्न मिटला आहे.
खरमुरे, लिमलेटच्या गोळ्या, बिस्कीट विक्री करून उदरनिर्वाह भागवितो. सध्या प्रवाशांची संख्या वाढल्याने बऱ्यापैकी व्यवसाय सुरू झाल्याचे जावेद खान यांनी सांगितले.
बसस्थानकावर पाणी बॉटल विक्री करून कसाबसा व्यवसाय करीत होतो. मात्र, मागच्या दोन महिन्यांत हा व्यवसाय बंद झाल्याने अडचण झाल्याचे हमीद खान यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात बस बंद असल्याने बांधकाम व्यवसायावर काम केले. आता बसेस सुरू झाल्याने पुन्हा हा व्यवसाय सुरू केला आहे, असे इमरान खान यांनी सांगितले.
एसटी महामंडळाला द्यावे लागते शुल्क !
n परभणी येथील बसस्थानकावर नोंदणीकृत ८ फेरीवाले असून, ते दररोज या ठिकाणी व्यवसाय करतात.
n दररोज साधारणत: ४००ते ५०० रुपयांचा व्यवसाय होतो. एसटी महामंडळाकडे महिन्याकाठी दीड हजार रुपये शुल्क जमा करावे लागते.