नरवाडी येथे दोन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST2021-03-07T04:16:52+5:302021-03-07T04:16:52+5:30

सोनपेठ : तालुक्यातील नरवाडी येथे ५ मार्चच्या रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी नगदी ...

Burglary at two places at Narwadi | नरवाडी येथे दोन ठिकाणी घरफोडी

नरवाडी येथे दोन ठिकाणी घरफोडी

सोनपेठ : तालुक्यातील नरवाडी येथे ५ मार्चच्या रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी नगदी ८ हजार रुपये लंपास केले. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील नरवाडी येथील केशव जोगदंड हे वडिलांच्या दवाखान्यासाठी १५ दिवसांपासून मुंबई येथे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. ५ मार्चच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी राहत असलेला केशव जोगदंड यांचा भाऊ श्रीधर जोगदंड हा झोपी गेला. सकाळी ५ च्या सुमारास उठला असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडत नव्हता. श्रीधर यांनी दरवाजा उघडला व बाहेर येऊन पाहिले असता घराला बाहेरून दोरीने बांधले होते. तेव्हा शेजारीच असलेले भावाचे घर उघडे दिसले. कुलूप तुटून पडलेले दिसले. तेव्हा त्यांनी घराची पाहणी केली असता भावाच्या घरातील पत्र्याच्या पेट्या व डबे उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. घरात कोणी नसल्यामुळे घरातून काय चोरीला गेले याची माहिती मिळू शकली नाही. तसेच श्रीधर जोगदंड यांच्या घराच्या पाठीमागे राजेभाऊ कदम यांच्या घराच्या बाहेरील बाजूला खिडकी आहे. या खिडकीचे दार उघडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून सामानाची नासधूस केली. तसेच कपाटातील नगदी ८ हजार रुपये चोरून नेले. श्रीधर जोगदंड यांच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Burglary at two places at Narwadi